Uncategorized

एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी : मुखेड धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन

मुखेड प्रतिनिधी:- 

एसटी आरक्षण अंमलबजावणीची पूर्तता लवकरात लवकर करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरुअसलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने मुखेड तहसील कार्यालय समोर रास्तारोको आंदोलन केलेमुखेड बंद आणि रास्तारोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवतांनापोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली एकीकडे मराठा समाजाने बंद पुकारलेला असताना दुसरीकडेधनगर समाजाला एसटी आरक्षण सवलतीची अंमलबजावणी व्हावी म्हणून मागील १५ दिवसापासूनपंढरपूर येथे धनगर समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहेतत्यामधील अनेक उपोषणकर्त्यांचीतब्येत खालावली आहेहि सर्व मंडळी धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावून लढतआहेतधनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एसटी आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यावर आलेलीआहे.

पंढरपूर येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी (ता२३रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होतापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो येळकोट येळकोट जय मल्हार आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणा देतमुखेड तहसील कार्यालय समोर सकल धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

सकल धनगर समाजाच्या आंदोलनात विजयकुमार सुगावकर,नागोराव पाटील कमळेवाडीकर, शिवलिंगनाईक चांडोळकर , बालाजी पाटील सकनूरकर ,श्री हनुमंतराव नरोटे,डी.एस.गोपनर,नारायण पाटीलकोटग्याळमाधवराव घोणसे,सचिन श्रीरामे  संजय सिंह देवकते संगम  संगमेश्वर देवकते विकास पाटीलहेळगिरे ,शंकर पाटील श्रीरामेगणेश बिरू,भुजंगराव देवारेपप्पू वाडीकरशिवाजी दबडे,ज्ञानेश्वर जामखेडेमशनाजी बाजगिरे ज्ञानेश्वर राजुरेशिवा कुंडगीर ,बळवंत काटशेव,बालाजी पा.सुगावकर,आनंद श्रीरामेशिकारामाधव देवकत्ते,बाळु नाईक जून्नेकर,सदाशिव देवकते ,कपिल नाईक ,सुनील होडगिरे ,सचिननाईक तसेच असंख्य धनगर समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button