सौ.कमल घोडके (मेनकुदळे) यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.

प्रतिनिधी प्रतिनिधी:-
केंद्रीय प्रा.शा. मुखेड केंद्रातील जि.प.प्रा.शाळा शिकारा येथील सह.शिक्षीका सौ.कमल गंगाराम घोडके(मेनकुदळे) हे नियतवयोमानाने नुकतेच सेवानिवृत्त झाले.शिकारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंचरसिकाबाई बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मुखेडचे गटशिक्षणाधिकारी मा. कैलासहोणधरणे शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कदम, प्रमुख अतिथी डॉ.शिवाजी कराळे शिक्षणविस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, दिलीप देवकांबळे, दिनबंधु बनसोडे, उपसरपंच शितलकुमारइमडे,मुख्याध्यापक श्रीपत राठोड व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकताच सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्नझाला.सौ.कमल घोडके(मेनकुदळे)यांचा सहपतीक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी बालासाहेब कदम यांनी सत्कार मुर्तीच्या कार्याचा गौरव पुर्ण उल्लेख आपल्या मनोगतातूनकेला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनी आपल्या आवडत्या शिक्षीका विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्वराज साधू तर आभार नारायण ग्यादलवाड यांनी मानले.कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी केंद्र संकुलातील व जि.प.प्रा.शिकारा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रमघेतले.



