मुखेड पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड तर कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे यांची निवड

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न मुखेड मराठी पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारणी ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यात सर्वानुमते अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वरी डोईजड, सचिव संतोष बेळगे तर कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे सलगरकर, उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न मुखेड मराठी पत्रकार संघटनेचा मागील कालावधी संपल्याने नूतन कार्यकारणी करण्यासाठी ॲड सुनील कोळकर यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड, सचिवपदी संतोष बेळगे, कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, माजी अध्यक्ष शिवाजी कोणापुरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील पौळकर, माजी अध्यक्ष किशोर संगेवार, ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शिवकांत मठपती ज्येष्ठ पत्रकार सुशील पत्की, प्रसिद्ध छायाचित्रकार हाफिजखान पठाण या सर्वांना सल्लागार म्हणून निवड करण्यात आली या निवडीबद्दल सर्वच कार्यकारिणीचे राजकीय , सामाजिक, शैक्षणिक , मित्र परिवारातून व इतर स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



