Uncategorized

तेलंगाना निवडणुकीत परकल विधानसभा निरीक्षकपदी डॉ. श्रावण रॅपनवाड यांची निवड

मुखेड प्रतिनिधी:- मुखेडचे भूमिपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड तेलंगाना विधानसभा निवडणुकीत परकल विधानसभेचे काँग्रेस निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चे तेलंगाना प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणातील विधानसभा निहाय पक्ष निरीक्षक नेमले असून त्यात वरंगल जिल्ह्यातील 104 परकल विधानसभेचे निरीक्षक म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपणवाड यांची नियुक्ती केली आहे. श्रावण रॅपनवाड हे भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर पूर्ण यात्रा चाललेले मराठवाड्यातील एकमेव भारत यात्री आहेत. प्रथम धाराशिव आणि आता हिंगोली जिल्ह्यात ते सह प्रभारी आहेत. नुकतेच पक्षाच्या विभागीय आढावा बैठकीसाठीही त्यांनी संभाजीनगरचे निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. छत्तीसगड ची राजधानी रायपूर येथील काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनातही व्यवस्थापन समितीवर त्यांना संधी मिळाली होती.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत वरंगल जिल्ह्यातील परकल विधानसभेचे निरीक्षक म्हणून डॉ.श्रावण रॅपणवाड यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण तेलंगाना राज्य विधानसभेचे विशेष निरीक्षक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,तेलंगाना प्रभारी माणिकरावजी ठाकरे, वरंगल लोकसभा निरीक्षक रवींद्र जी दळवी, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. अविनाश घाटे, मंत्री डी.पी सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,माजी आ.अमरनाथ राजूरकर,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, ओबीसी नेते विश्वनाथराव कोलमकर, प्रदेश सचिव ऍड.सुरेंद्र घोडजकर, तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार मडगूलवार, सुभाष पाटील दापकेकर, राजन देशपांडे, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोषराव बोनलेवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर, ॲड.आशिष कुलकर्णी,युवा शहराध्यक्ष अदनान पाशा, जयप्रकाश कानगुले, गोविंदराव भालके आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button