आरोग्य

मुखेड उपजिल्हा रुग्णालयासह प्रा.आरोग्य केंद्र,उपकेंद्रात अँटी रॅबिज इंजेक्शनचा तुटवडा.

मुखेड / प्रतिनिधी

    शासन स्तरावरून तब्बल दोन महिन्यांपासून कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असणारे अँटी रेबिजइंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात असल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिक उपजिल्हा रुग्णालयात येतआहेत.पण उपजिल्हा रूग्णालयातसुद्धा पुरवठा जेमतेम असल्याने दररोज अनेक नागरिकांना बाहेरीलखाजगी मेडिकल स्टोर मधुन इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातीलप्राथमिक आरोग्य केंद्र  उपकेंद्रातही इजेंक्शन रुग्णांना मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होवुनहेळसांड होत आहे.रुग्णांची गैरसोय थांबविण्यासाठी या महत्वपुर्ण विषयाकडे संबधित विभागाच्या वरिष्ठअधिकारी यांनी लक्ष्य घालुन सर्वसामान्य नागरिकांना इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे अशी मागणीतालुक्यातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे

    मुखेड तालुक्यात ०१ उपजिल्हा रूग्णालय०८ प्राथमिक आरोग्य केंद्र  ३६ आरोग्य उपकेंद्र कार्यरतआहेतपण या सर्व रूग्णालयात  आरोग्य केंद्रात मागील दोन महिण्यापासुन शासन स्तरावरून कुत्राचावल्यानंतर आवश्यक असणारे अँटी रेबिज इंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने संपूर्णतालुक्यातील वेगवेगळ्या गावातील नागरिक कुत्रा वाचल्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी मुखेड उपजिल्हारुग्णालय गाठत आहेत.कारण त्यांना त्यांच्या गावाजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र  उपकेंद्रात इंजेक्शनवेळेवर रुग्णांना देण्यासाठी भेटत नाहीत त्यामुळे नागरिक परेशान होत आहेत.कुत्रा वाचल्यावर घेण्याचेइंजेक्शन मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये भिती निर्माण होत आहे.सरकारी दवाखान्यात इंजेक्शन मिळतनसल्यामुळे  सर्वसामान्य नागरिकांना सदरील इंजेक्शन विकत घ्यावे लागते आहे.रुग्णांच्या नातेवाईकांनाआर्थीक भुर्दंड सोसावे लागत आहे.

    शहरातील उपजिल्हा रूग्णालयात ११ जानेवारी रोजी एका युवकास कुत्रा चावल्यानंतर रूग्णालयातनेण्यात आले.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अँटी रेंबिज इंजेक्शनसाठी चक्क नांदेडला रेफरचे पत्र दिल्याचेरुग्णांच्या नातेवाईकाने सांगितले.अशा या  महत्त्वाच्या विषयाकडे जिल्हा शल्य चिकित्सक  जिल्हाआरोग्य अधिकारी यांनी लक्ष देवून रुग्णांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांतुन होतआहे.कोणत्याही व्यक्तींला कुत्रा चावल्यास त्यांना चार अँटी रॅबिज इंजेक्शन घ्यावे लागताततसेचचावलेली जखम खोल असल्यास अँटी रॅबिज सिरम घ्यावे लागते तेही जिल्हा स्तरावर मिळत असल्यानेसर्वसामान्य नागरिकांना कुत्रा चावल्यानंतर सरळ नांदेडला रेफर करावे लागत आहे.किंवा रुग्णांना खाजगीमेडिकल स्टोरमधुन इंजेक्शन घ्यावे लागत आहेतालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र  उपकेंद्रात दोनमहिन्यापासून अँटी रँबिज इंजेक्शनचा आरोग्य विभागाकडून पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांची हेळसांडहोत आहे याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने घेवुन इंजेक्शन उपलब्ध करुण देण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button