हिमायतनगर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याचीमागणी..

•प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
हिमायतनगर प्रतिनिधी:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणिमध्यमवर्गीयांसाठी पीएम आवास योजना (PMAY 2.0 Scheme) सुरू केली आहे. सदर योजनेचे नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना घरकुल योजनेची मागणी हिमायतनगर नगरपंचायतचे मा. नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी मुख्याधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे
शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 चालू केलेली असून, हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक01 ते 17 मधील नागरिकांची नवीन घरकुल मिळणे बाबत आपल्या कार्यालयामार्फत प्रधानमंत्री आवासयोजना (शहरी) 2.0 अंतर्गत नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारून सदरील लाभार्थ्यांना घरकुलाचालाभ मिळावा या साठी दि १४ जानेवारी रोजी मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय यांना मा. नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद निवेदनाद्वारे मागणी केली आहे



