Uncategorized
मुखेड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेताब शेख तर सचिवपदी राजेश बंडे.

मुखेड / प्रतिनिधी.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्णिंत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी हरिहर धुतमल यांच्या मार्गदर्शनखाली व जिल्हा संघटक ॲड संदीप कामशेट्टे आणि ज्येष्ठ पत्रकार यशवंत बोडके, दादाराव आगलावे, आशिष कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीकृत सदस्या मधून जाहीर करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्षपदी महेताब शेख, सचिवपदी राजेश बंडे, सल्लागार यशवंतराव बोडके, अॅड संदीप कामशेट्टे, दादाराव आगलावे, अॅड आशिष कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी नामदेव श्रिमंगले,
उपाध्यक्षपदी दत्तात्रय कांबळे, उपाध्यक्षपदी रामदास पाटील, संघटकपदी संजय कांबळे, कोषाध्यक्षपदी जगदीश जोगदंड, कार्यकारणी सदस्य म्हणून जैनोदीन पटेल, विठ्ठल पाटील येवतीकर, राजु रोडगे आदींची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नूतन कार्यकारिणीचे आमदार डॉ. तुषार राठोड, माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड, बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील आंबुलगेकर, खुशालराव पाटील उमरदरीकर, सुभाष पाटील दापकेकर, संतोष बोनलेवाड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, विजय जोशी, अनिल कसबे, चारुदत्त चौधरी, राम तरटे, आदिनी अभिनंदन केले आहे.



