आज दैनिक प्रबुद्ध परिवारच्या वर्धापन दिन व पुरस्कार सोहळ्यास मनःपूर्वक सदिच्छा!

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड :- २० सप्टेंबर २६
नांदेड येथून प्रसिद्ध होणारे अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक प्रबुद्ध परिवार’ हे केवळ एक वृत्तपत्र नसून आंबेडकरी चळवळीचा बुलंद आणि प्रभावी आवाज म्हणून जनमानसात ओळखले जाते. सत्य, न्याय आणि समाजहित या त्रिसूत्रीवर आधारलेली पत्रकारिता करत या दैनिकाने अल्पावधीतच वाचकांच्याहृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.
‘दैनिक प्रबुद्ध परिवार‘ आणि ‘प्रबुद्ध टेम्पल चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड‘ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेला ‘भव्य वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा २०२६’ हा सामाजिक, सांस्कृतिक आणिपत्रकारिता क्षेत्रातील एक अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि दिशादर्शक कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. यामुळे समाजातील चांगल्या कामांना प्रोत्साहन मिळते आणि नव्या पिढीला प्रेरणा लाभते.
मुख्य संपादक संजय व्ही. खाडे यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि कुशल संपादनाखाली दैनिक प्रबुद्धपरिवाराची अविरत वाटचाल अशीच यशस्वीपणे चालू राहो. शोषितांचा आवाज बुलंद करण्याचे आणि समाजात प्रबोधनाची ज्योत तेवत ठेवण्याचे आपले कार्य निरंतर सुरू राहो, हीच सदिच्छा.
या भव्य वर्धापन दिनानिमित्त दैनिक प्रबुद्ध परिवाराचे संपादक मंडळ, सर्व पत्रकार बांधव, कर्मचारी वर्गआणि पुरस्कार प्राप्त सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!
मुख्य संपादक:- आसद इब्राहिम बल्खी
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क



