प्रशासनाच्या कडक निगराणीत नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्रावर शालांत परीक्षा सुरळीत

मुखेड: प्रतिनिधी २२ फेब्रुवारी २६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालांतप्रमाणपत्र इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा सध्या सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जनता शिक्षण प्रसारकमंडळ नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथील परीक्षा केंद्रावर प्रशासनाच्या कडक निगराणीत आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान‘ अंतर्गत उमरदरी केंद्रावर विशेष खबरदारी घेतलीजात आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र संचालक आणिपर्यवेक्षकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची कसून तपासणीकेल्यानंतरच त्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जात आहे.

विश्वासनीय सुत्रांकडून सांगण्यात आले की काही असामाजिक तत्त्वांद्वारे व शाळेतील हकालपट्टी केलेल्या एका माजी मुख्याध्यापकाला हाताशी धरून खंडणीखोर तोतया पत्रकार हा या केंद्रावर मोठ्यारकमा घेऊन परीक्षा केंद्रावर काॅपी चालवण्यासाठी आटापिटा करत कर्मचाऱ्यांवर दबाव आणत होता पण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी कुठलाही दबाव न घेता पोलिस आणि शिक्षण खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची मदत घेऊन संबंधितांचे गैरकारभार करण्याचे मनसुबे उधळून लावले आहेत.सदरील परीक्षा सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत सुरू असल्यामुळे शिक्ष विभागातील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रशासनाच्या नियोजनामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थी कोणत्याही दडपणाशिवाय आपली परीक्षा देत आहेत.
“विद्यार्थ्यांनी निर्भयपणे आणि शांत वातावरणात परीक्षा द्यावी, यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सीसीटीव्ही आणि पर्यवेक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेवर आमचे बारीक लक्षआहे.” मुख्याध्यापिका :- श्रमती देशपांडे एस पी



