मुक्रमाबादमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई 9 किलो 850 ग्रॅम गांजा जप्त, दोघांना अटक

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ जून २६
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नांदेड पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुक्रमाबाद परिसरातून दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ९ किलो ८५० ग्रॅम गांजा व एक मोटारसायकल असा एकूण ६ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. या कारवाईत रामकिशन मुलगीर नटवे(रा. जळकोट, जि. लातूर) व शंकर सदानंद धोते (रा. लते गल्ली, जि. लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून गांजा व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधिकारी करीत आहेत.


