मुखेड शहरातील घटना दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने पळविली ७ लाख ७० हजारांची रक्कम

मुखेड प्रतिनिधी:- १९ जून २५
मुखेड शहरातील नांदेड मर्चेंट बँकेच्या बाहेर चोरट्याने भरदिवसा दुचाकीची डिक्की काढूनत्यातील ७ लाख ७० हजार रुपयांची रक्कम पळविली घटना दि. १८ जून रोजी सकाळी ११: ३० वाजताघडली.
फिर्यादी देवीप्रसाद संभाजी वडजे वय २९ वर्ष रा. अशोक नगर व्यवसाय गोविंद स्टोन क्रेशर वर्ताळा तांडा. ता. मुखेड येथील व्यवस्थापक यांनी सकाळी ११ वाजता मुखेड शहरातील एसबीआय बँकेत जाऊन ७लाख ७० हजार रुपये उचलले. त्यात १०० व २०० च्या नोटा असल्याने बदलून घेण्यासाठी दुचाकी वाहनक्रमांक एमएच २६ ए एक्स ६७९६ या गाडीवर शहरातील असलेल्या नांदेड मर्चेंट बँकेसमोर गाडी लावून५०० रुपयांच्या नोटा बदलून मिळेल का ? म्हणून विचारण्यासाठी बँकेत गेले होते. बँकेतुन परतआल्यावर डिक्कीतील रक्कम नसल्याचे समजले.
यावेळी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ७ लाख ७० हजार रुपयांची पिशवीदोन युवक मोटार सायकलवर येऊन डिक्कीतून पिशवी काढून पळ काढताना दिसत आहेत. या प्रकरणीफिर्यादी देवीप्रसाद वडजे यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) अन्वये दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसउपनिरीक्षक मंचक फड हे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता देगलूरचे पोलीस उपविभागीय अधिकारीसंकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली व नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे टीम यांनी सुद्धाघटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे
