राजकीय

मुखेड विधानसभेसाठी २४ उमेदवारांचे ३५ नामनिर्देशन पत्र दाखल

मुखेड : प्रतिनिधी

विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी दि.२९ रोजी मंगळवारी १३ उमेदवारांचे १९ नामनिर्देशन पत्रप्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

९१मुखेड –कंधार विधानसभेसाठी दि.२४ ऑक्टोंबर पासून शेवटच्या २९ ऑक्टोंबर रोजी पर्यंत एकुण  १२८  फॉर्म विक्री झाले होते.यातील  २४ उमेदवारांनी  ३५ नामनिर्देशन पञ दाखल केले  आहेत.

दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत होती तर  नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागेघेता येणार आहेत.

एकूण २४ उमेदवारांचे ३५ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेतयामध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून   डॉ.तुषार गोविंदराव राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे हणमंतराव  पाटील बेटमोगरेकर यांनी उमेदवारी दाखल केलीतर अपक्ष म्हणून मुख्यमंत्रीचे माजी खाजगी सचिव बालाजी नामदेव खतगावकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथराव मंगाजी लोहबंदे,अपक्ष डॉ.श्रीहरी राजाराम बुडगेमवार ,राष्ट्रवादीचे शरद पवार गट तालुकाध्यक्ष अपक्ष अॅड.शिवाजी नागोरावजाधव ,अपक्ष  संतोष भगवान राठोड,शेकाप कडुन गोविंद दादाराव डूमने , वंचित कडून  रावसाहेब दिगंबरपाटील तारदडेकर,प्रहार संघटनेकडुन राहुल राजू नावंदे  अपक्ष  सचिन गोवर्धन चव्हाण ,प्रदीप धर्माजीइंगोलेरुक्मिणबाई शंकर गित्ते,यादव बळीराम कांबळेप्रकाश चांदोबा गवलवाड , कल्पना संजयगायकवाड,खंडेराव हैबतराव हसनाळकरअहिल्याबाई हणमंत मामिलवाड , देवानंद तुलजाराम देशमुख ,विजयकुमार भगवान पेटकर,मस्तान पासुमिया पिंजारी ,सतिश लक्ष्मण कावडे,परशुराम दत्ता कदम , हरिदास संतुका दिंडे अशा २४जनांनी ३५ उमेदवारी अर्ज समावेश असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले

या वेळी निवडनुक खर्च निरिक्षक .गोविंदराज यांनी मतदार संघाच्या निवडनुक निर्णय अधिकारी यांच्याकार्यालयाशी भेट देऊन खर्च पथकाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मिडिया कक्षाला भेट देऊनमार्गदर्शक सुचना दिल्यायावेळी निवडनुक निर्णय अधिकारी अनुप पाटीलसहानिवडनुक निर्णयअधिकारी राजेश जाधव,तानाजी चव्हाण,निवडनुक विभागाचे नायब तहसीलदार सतिश जोहरे,निवडनुकविभागाचे प्रशांत लिंबेकर,शंकर कुसुमकर,नायब तहसीलदार पि.डी.गंगनर, मिडिया कक्ष प्रमुख उत्तम नारलावर,शिवशंकर कुच्चेवाडरफिक बागवान .उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button