उद्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त अग्निकुंड व पालखी सोहळ्याचे आयोजन

मुखेड/प्रतिनिधी:-
मुखेडचे ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी यात्रेस प्रांरभ झाला असून दि. २१ रोजी पहाटे ४ वा. अग्रिकुंड होणारआहे. या वर्षी निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कुस्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त महाराष्ट्र सह कर्नाटक, तेलंगानाराज्यातून हजारो भाविक भक्त येतात. या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे अग्निकुंड. या अग्ग्रीकुंडातीलविस्तवावरून भाविक उघड्या पायाने चालतात. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवारी सायंकाळी श्रीवीरभद्रेश्वर भगवान मंदिरात प्रसाद गुळ (शिरणी) वाटपाचा कार्यक्रम व दि.२१ रोज गुरुवारी पहाटे अग्ग्रीकुंडव पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रकाश पाटील बेळीकर यांच्याकडून कर्नाटकातीलपूर्वतांचा कार्यक्रम व अतुल देबडवार यांच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी तसेच शिवराज मुगावेयांच्यावतीने विद्युत रोषणाई, यादव गव्हाणे यांच्या वतीने दीप सजावट करण्यात येणार आहे. पौर्णिमेपासून(दि.१५ ते २१ पर्यंत) मंदिरात वीरशैव महिला व पुरुष भजनी मंडळ यांचा दुपारी २ ते ५ या वेळेत भजनाचाकार्यक्रम राहील व रात्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ बारवगल्ली मुखेड यांचा कार्यक्रम राहील. दि.२० बुधवारसायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत स्थानिक कलाकार वीरभद्र मठपती, उत्तमराव वन्नाळे, गोविंदरावकोतापल्ले, दीपक कोतापल्ले, सरिता पुरी, उमाताई कोत्तापल्ले, सुमती भालके, वसंत पाटील, दत्तात्रयनिम्मलवाड, रामदास बत्तेवाड, जयपाल मठपती, पांडुरंग बेळीकर, शेलार रोडगे, वादक संजय उमाटे, सुरेंद्रभद्रे, रविंद्र भद्रे, शिवराज उमाटे, अनुप वन्नाळे, विष्णुदास उमाटे, हरिदास उमाटे, ऋषिकेश इंगोले, बासरीवादक व्यंकटराव हंगरगे, निवेदक शंकरराव मुंडे, प्राचार्य रामकृष्ण बदने, बालाजी इंगोले यांच्या भक्तीगितांचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी पहाटे अग्नि कुंडाचा कार्यक्रम व पालखी मिरवणूक होणार आहे यासर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री वीरभद्रेश्वर भगवान ग्राम देवस्थान व समस्त गावकरी मंडळींच्यावतीने करण्यात आले आहे.



