मुखेडात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड – भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तदि. ६ डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सामूहिक बौद्धवंदना आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिकायासह अनुयायीणी मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तरशहरातील फुलेनगर येथील बौद्ध मूर्ती पासून तर मिलिंद नगर येथील बौद्ध विहारा पासून शहरातील मुख्यरस्त्याने कॅन्डल मार्च काढण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मार्कात सकाळच्या सत्रातउपस्थित मान्यवरांनी सामूहिक वंदना करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण केले. समाजासाठी त्यांनीकेलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्व अधोरेखितकरण्यात आले. या सभेसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. जि.प. सदस्य दशरथरावजी लोहबंदे, गौतम काळे, के. एच. हसनाळकर, गंगाधर सोंडारे, दीपक लोहबंदे, कलमलाकर घोडके, डॉ. राहुल कांबळे, राजू घोडके, बाबुराव येवतीकर, इंजि. वाघमारे, भारतीताई काळे, भद्रेताई, कुलदीप कोतापल्ले, बाबुराव तांदळीकर, पी.एस. कांबळे, विठ्ठल शिरसाटे, संदीप बावलगावकर यांचा समावेश अनेक सामाजिक कार्यात असणारेअनुयायी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, बंधुत्व, आणि समतेच्याविचारांचा प्रसार करण्यासाठी उपस्थितांनी पुढाकार घेतला.



