Uncategorized
नैसर्गिक साधन संपत्ती चे जतन करणे काळाची गरज..प्रा संजीव डोईबळे

मुखेड प्रतिनिधी:-
दि 14.डिसेंबर.24 रोजी शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस’ प्राचार्य डॉ मनोहर तोटरे यांच्या मार्गदर्शना नुसार साजरा करण्यात आला.या वेळी रासे यो कार्यक्रमाधिकारी प्रा संजीव डोईबळे यांनी नैसर्गिक साधन संपतीचे जतन करणे का गरजेचे आहे या विषयी सांगून त्यांनी ऊर्जा संवर्धन साठीच्या उपाय पण सागीतले,प्रमुख पाहुणे प्रा नाईक प्रवीण यांनी सोलार एनर्जी ,विंड एनर्जी बाबत ची माहिती सागितली तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती ही दिली.
कार्यक्रम आयोजनात सुमेध जोंधळे .प्रदीप बोडके ,कु संतोषी पांचाळ ,कु भाग्यश्री देवपूजे कु अनुसया डोमाटे यांनी विशेष परिश्रम घेतले .सुत्र संचलन व आभार प्रा कु शिल्पा वाघमारे यांनी मानले



