Uncategorized
पत्रकार संरक्षण समिती देगलूर तालुकाध्यक्ष पदी शेख असलम तर उपाध्यक्षपदी अमित पाटील यांची निवड
देगलूर/प्रतिनिधी
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार, जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली युवा पत्रकार शेख असलम यांच्या नेतृत्वाखालील देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. हा कार्यक्रम देगलूर येथील विश्रामगृहात पार पडला.
तालुकाध्यक्ष यांनी केवळ चार-पाच दिवसांत कार्यकारिणीची स्थापना केली. त्यांच्या या प्रयत्नांची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.
जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे, जिल्हा संघटक मोहम्मद रफिक, सोशल मीडिया उपाध्यक्ष आशिष कृष्णुरकर, आणि ॲडोकेट सुनिल नागोरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात संघटनेचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
देगलूर तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष: शेख असलम, उपाध्यक्ष: अमित पाटील, सचिव: मिलिंद वाघमारे, कार्याध्यक्ष: धनाजी देशमुख, सल्लागार: ॲड. काझी परवेज, कोषाध्यक्ष: काझी तौहीत, संघटक: गजानन टेकाळे, सहसचिव: मनोज बिरादार, प्रसिद्धीप्रमुख: धनाजी जोशी, सहकोषाध्यक्ष: गजानन शिंदे, सदस्य: किरण सोनकांबळे, उबेद हबीब आदींची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड म्हणाले की, "नवी कार्यकारिणी देगलूर तालुक्यातील पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावेल."
कार्यक्रमात प्रस्ताविक भाषण करताना शेख असलम यांनी संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, आणि जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांचे आभार मानले. त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त करत, पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी संघर्ष करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मिलिंद वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष तौहीत काझी यांनी मानले.
कार्यक्रमाचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला आणि पत्रकार संरक्षण समितीच्या पुढील वाटचालीसाठी अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या..