जांब बु येथील सोसायटीतील कागदपत्रे चोरीस अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
जांब प्रतिनिधी:-
तालुक्यातील जांब बु येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या कार्यालयात चोरीझाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी २००७ ते २०१० या कालावधीतील मासिक व वार्षिक सभेचीसुचना बुक, प्रोसिडींग बुक, किर्द रजिस्टर आणि कर्ज खतावणीचे जुने रजिस्टर असे एकूण सहा महत्त्वाचेकागदपत्रे चोरुन नेली आहेत.
सोसायटी सचिव रोहीदास वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताकार्यालय कुलूपबंद केले होते. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयात आल्यावर कुलूप तोडूनखिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी लोखंडी कपाटातून महत्त्वाचीकागदपत्रे लंपास केली असून, यांची अंदाजे किंमत ५८० रुपये आहे.
या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३३१ (४) आणि३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २००७ ते २०१० या काळात सोसायटीवरप्रशासक नेमण्यात आला होता. तसेच, जागेच्या मालकीसंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. त्यामुळे हीचोरी हेतुपुरस्सर केली गेली की साधी चोरी आहे, यावर गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे



