उद्यापासून श्रावणकावडी देवस्थानचा कलशारोहण कार्यक्रम

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड शहरापासून जवळच असलेल्या ऐतिहासिक रामायणकालीन श्रावणकावडी देवस्थानच्याकलशारोहण कार्यक्रमास ५ फेब्रुवारीपासून सुरुवात तर ९ फेब्रुवारी रोजी सांगता होणार असल्याची माहितीश्रावणकावडी देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास येवती मठाचे मठाधिपती सद्गुरु नराश्याम महाराज, मुखेड गणाचार्य मठाचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, हाळदा मठाचे मठाधिपती हाळदेकर महाराज, कोलंबी मठाचे मठाधिपतीकोलंबीकर महाराज, बेटमोगरा मठाचे मठाधिपती डॉ. सिध्ददयाळ बेटमोगरेकर महाराज, बारुळ मठाचेमठाधिपती श्रीसंत नामदेव महाराज बारुळकर, दापका मठाचे मठाधिपती नामदेव महाराज दापकेकर यांचीप्रमुख उपस्थिती असणार आहे.
५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार असून, रात्री ८ वाजताएकनाथ महाराज वंडगीरकर, ६ रोजी त्र्यंबक महाराज नंदगावकर यांचे कीर्तन, ७ रोजी सकाळी ९ वाजतामूर्ती प्राणप्रतिष्ठापणा, कलशारोहण मठाधिपतींच्या सान्नीध्यांत होणार आहे तसेच रात्री ८ वाजता नामदेवमहाराज दापकेकर यांचे कीर्तन होणार आहे. ८ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहेतसेच ९ फेब्रुवारी रोजी नरसिंग महाराज केरुरकर यांचे सकाळी ११ वाजता काल्याचे कीर्तन व दुपारीमहाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमासाठी ब्रह्मवृंद वे.शा.सं.श्री प्रबोधन महाराज शास्त्री पाळेकर, ह.भ.प. शिवाजी महाराज जळकोटकर, अण्णासाहेब महाराज जुन्नेकर यांच्या नियोजनात कार्यक्रम होतील. यासंपूर्ण कार्यक्रमास भाविक– भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्याबाई भीमरावमहाराज श्रावणकावडीकर यांनी केले आहे.
दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी गजानन उत्तमराव कवटीकवार, ६ रोजी श्रावणकावडी देवस्थान समिती व रामरावमस्कले, ७ रोजी संतोष मारोतीराव बोनलेवाड, ८ रोजी बाबुराव हाणमंतराव देबडवार व राजेश चौधरी व ९रोजी बबलू शेषराव टेकाळे यांच्या वतीने अन्नदान होणार आहे



