आरोग्य

मन्नेरवारलू सखी मंचाने रक्तदान शिबीर आयोजित करुन एक आदर्श निर्माण केला. मंगाराणी आंबुलगेकर

नांदेड प्रतिनिधी:-

समाजातील महिलांना संघटीत करून फक्त हळदी कुंकू कार्यक्रम वाण देऊन साजरा न करता रक्तदान रुपी वाण देण्याचा अभिनव उपक्रम मन्नेरवारलू सखी मंचाने राबवला आहे. हि बाब समाजासाठी अभिमानास्पद आहे.याच बरोबर समाजातील विविध क्षेत्रातील कतृत्वान महिलांचा सन्मान आपण आयोजित करुन समाजिक बा़ंधिलकी आपण जपली आहे.असेच समाजोपयोगी कार्य सखी मंचाच्या माध्यमातून करावे.यासाठी मी समाजातील एक महिला महणून समाजा सोबत राहीन. असे मनोगत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ मंगराणी आंबुलगेकर यांनी व्यक्त केले.
रविवारी मन्नेरवारलू सखी मंचाच्या वतिने आयोजित हळदी कुंकुकार्यक्रमात सखी मंचाच्या संघटक सौ सुचिता गंदपवाड यांनी प्रास्ताविक करताना म्हणाल्या ,”आदिवासी मन्नेरवारलू समाज आज विखुरलेला आहे.समाजातील महिलाचे प्रश्न व महिलाना एकत्रित करुन समाजोपयोगी कार्य करण्याचा उदेश ठेवून या संखी मंचाची निर्मिती केली.” असल्याचे सांगितले.
यावेळी समाजातील कतृत्वान महिलांचा सन्मान विशेष सन्मान राज्य शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानीत केलेल्या सौ मिरा परोडवार यांचा तर समाजातील जेष्ठ मार्गदशिका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती भागिरथी बच्चेवार ,लेखक प्रेमचंद अंतरराष्ट्रीय साहित्य विरांगणा पुरस्काराने सन्मानीत श्रीमती नागज्योती पडगलवार ,जेष्ठ आदर्श शिक्षिका सौ ललिता कोलेवाड, सौ मिनाक्षी मुपडे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी समाजातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ शितल सिध्देवाड,डॉ तोटावार,डॉ नेहा बास्टेवाड,डॉ स्वाती पुपुलवाड, डॉ पुनम हरनाळीकर भगिनीचाही सन्मान करण्यात आला. गोळवलकर गुरूजी रक्त केंद्राकडे समाजातील महिला व उपस्थित पुरुष बांधवांनी रक्तदान केले. यावेळी महिलांचे विचार ,कविता गायन, संगित खुर्ची असे वेगवेगळ्या उपक्रम घेऊन महिलाचा दैनंदिन ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न या हळदी कुंकू कार्यक्रमत करण्यात आला. यासाठी सखी मंचानेच्या संघटक सौ ललिता बोलमवाड,सौ शिवकांता कोरडवार,सौ राजश्री पडलवार, सौ स्मिता ठक्करवाड, सौ मिनाक्षी बोंडले,सौ मंजुषा पुपुलवाड, सौ संगिता सिंगरवाड,सौ आश्विनी मारकवाड,श्रीमती पद्दमीन कासेवाड,सौ अंजना आलमवाड, सौ भारती बाशेट्टीवाड ,श्रीमती अनिता कवडेवाड, सौ स्मिता मिटके,सौ कविता तोटावार,सौ वैजयंता सुक्रे,सौ कुसुम इंगेवाड, सौ पंचफुला नाईनवाड, सौ रंजना बाचेवाड, सौ मंजुषा कोस्केवाड,श्रीमती शिवकांता कोंढरे, श्रीमती मनिषा पालेपवाड,सौ सुशिला अबुलकोड,सौ विजया आंदेलवाड,सौ छाया तोटावार यासह संखी मंचाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button