राजमाता अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुखेड प्रतिनिधी:-
येथील श्रावणकावडी देवस्थान येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व स्वच्छतेचे प्रतीक असलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी आ. हणमंतराव पाटीलबेटमोगरेकर, भाजपनेते माधव अण्णा साठे, रामचंद्र आडेपवार, किशन पाटील हाके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दि. ८ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आले. तर दि.९ रोजी सकाळी १० वाजता काल्याची किर्तनाने पाच दिवसीय सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, धोबी समाजाचे नेते बालाजीराव शिंदे, ओ.बी.सी. समाजाचे नेते विश्वनाथ कोलमकर, माजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणी, अॅड. शिवराज पाटील कुंद्राळकर, सत्यवान अण्णा गरुडकर, मंदिरबांधकाम साठी डिझाईन केलेले इंजि. भारत गरूडकर, डॉ. रामराव श्रीरामे, रामराव मस्कले, अशोक पाटीलनाईक, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. सतीश धमणे, शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, शेतकरी नेते शिवशंकरपाटील कलंबरकर, बालाजी चाफेकर, संभाजी पाटील उन्द्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती



