गृहरक्षक दलाचे जवान इब्राहिम बल्खी यांच्या निधनाबद्दल पोलिस ठाणे कडून श्रद्धांजली अर्पण

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड (जि. नांदेड) – गृहरक्षक दलाचे सेवानिवृत्त जवान इब्राहिम बल्खी (वय 76) यांच्या निधनानंतर मुखेड पोलिस ठाणे आणि तालुका समादेशक अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलिस ठाण्यात दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, तालुका समादेशक अधिकारी सतीश भुरेवार, पोलिस उपनिरीक्षक मंचक फड, गुप्तचर विभागाचे पाळेकर, तसेच सर्व होमगार्ड उपस्थित होते.
इब्राहिम बल्खी यांचे दि. ७ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता वनपरीक्षेत्र कार्यालयाजवळील कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी मुखेड येथील समादेशक कार्यालयाच्या अंतर्गत गृहरक्षक दलात २५ वर्षे निष्ठेने सेवा बजावली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
मुखेड पोलिस ठाणे व तालुका समादेशक अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या.



