सामाजिक

मुखेड तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर; ६६ गावांत महिला राज, राजकीय घडामोडींना वेग

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २३ सप्टेंबर २६

 तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार अक्षयराज नंजुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात पार पडली. या सोडतीत एकूण ६६ पदे महिलांसाठी राखीव झाली असून अनुसूचित जातीसाठी २९, अनुसूचित जमातीसाठी ८, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) २८ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६५ पदे निश्चित करण्यात आली आहेत.

प्रवर्गनिहाय आरक्षणात अनुसूचित जातीच्या २९ गावांमध्ये हंगरगा (प.क.), इटग्याळ (प.दे.), हंगरगा (खु.), हातराळ, आंबुलगा (बु.), लखमापूर, बोरगाव, उंद्री (प.दे.), खरब खंडगाव, मंग्याळ, इटग्याळ (प.मु.), येवती, बामणी, मोटरगा, हिब्बट, खतगाव (प.मु.), जांब (खु.), पाळा, वळकी, कलंबर, रावणकोळा, भिंगोली, सुगाव (बु.), डोरनाळी, बेरळी (खु.), चिवळी, सुगाव (खु.), सलगरा (बु.) आणि मारजवाडी यांचा समावेश आहे; यांपैकी इटग्याळ (प.दे.), हातराळ, आंबुलगा (बु.), लखमापूर, उंद्री (प.दे.), खरबखंडगाव, इटग्याळ (प.मु.), येवती, बामणी, पाळा, कलंबर, भिंगोली, डोरनाळी, चिवळी व मारजवाडी ही १५ गावे महिलांसाठी राखीव झाली आहेत.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८ गावांमध्ये एकलारा, मेथी/खपराळ, आखरगा, मंडलापूर, राजुरा (खु.)/ठाणा, होनवडज, मांजरी व जाहर यांचा समावेश असून त्यातील राजुरा (खु.)/ठाणा, होनवडज, मांजरी आणि मेथी/खपराळ ही ४ गावे महिलांसाठी राखीव आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्गातील २८ गावांमध्ये उच्चा (बु.), कुंद्राळा, केरूर, कोटग्याळ, कोळनूर, खातगाव (प.मु.), गोजेगाव, गोणेगाव, जिरगा, जुत्रा, तुपडाळ (खु.), थोटवाडी, बापशेटवाडी, बावनवाडी, बेत्राल, भाटापूर (प.दे.), भेंडेगाव (बु.), मावळी, रावणगाव/भाटापूर पं., वांडगीर, सांगवी (बे.), सांगवी (भा.), रत्नतांडा, शिकारा, होंडाळा, भासवाडी/बिहारीपूर, सावरगाव वाडी आणि भाटापूर (प.मु.) यांचा समावेश असून त्यातील कुंद्राळा, केरूर, कोटग्याळ, कोळनूर, गोजेगाव, जिरगा, जुत्रा, बापशेटवाडी, भाटापूर (प.मु.), भेंडेगाव (बु.), मावळी, शिकारा, होंडाळा व भासवाडी/बिहारीपूर ही १४ गावे महिला राखीव झाली आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गातील ६५ गावांमध्ये आंदेगाव, आडलूर/नंदगाव (प.दे.), उमरदरी, औराळ, कबनूर, कर्णा, कोटग्याळवाडी, कोळगाव, चव्हाणवाडी, चांडोळा, चोंडी, जांब (बु.), जांभळी, डोंगरगाव, तुपडाळ, तांदळी, तारदडवाडी, दापका (राजा), दापका (गु.), धनज/जामखेड, धामणगाव, नंदगाव (प.क.), निवळी, परतपूर, पांडुर्णी, पिंपळकुंठा, बावलगाव, बाऱ्हाळी, बिल्लाळी, बेटमोगरा, बेरळी (बु.), बोमनाळी, भगनूरवाडी, भेंडेगाव (खु.), मुक्रामाबाद, राजुरा (बु.), राजुरा (बु.) तांडा, रावी, लादगा, लोणाळ, वडगाव, वर्ताळा/शेळकेवाडी, सकनूर, सलगरा (खु.), सावरगाव (पि.), सावरमाळ, सावळी, हसनाळ (प.मु.), हाळणी/नागराळ, हिरानगर, होकर्णा, फुटकळवाडी, पाखंडेवाडी, उंद्री (प.मु.), कमळेवाडी, कामजळगा, खैरका, चिंचगाव, देगाव, माकणी, लिंगापूर, वसूर, हसनाळ (प.दे.), हिप्परगा (दे.) आणि हिप्पळनारी यांचा समावेश असून त्यातील आंदेगाव, कबनूर, कोटग्याळवाडी, कोळगाव, चोंडी, जांब (बु.), जांभळी, तारदडवाडी, दापका (राजा), धनज/जामखेड, धामणगाव, निवळी, पांडुर्णी, बावलगाव, बाऱ्हाळी, बेटमोगरा, बेरळी (बु.), बोमनाळी, भगनूरवाडी, राजुरा (बु.), राजुरा (बु.) तांडा, लादगा, लोणाळ, सकनूर, सावरमाळ, सावळी, उंद्री (प.मु.), कमळेवाडी, कामजळगा, वसूर, हसनाळ (प.दे.), हिप्परगा (दे.) आणि हिप्पळनारी ही ३३ गावे महिलांसाठी राखीव झाली आहेत. आरक्षण निश्चित झाल्याने आता गावपातळीवर राजकीय आघाड्या आणि समीकरणांच्या जुळवा जुळवीला वेग आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button