नांदेड तालुक्यातील शासकीय डेपो मधील रेतीसाठयाचा १९ जून रोजी जाहिर लिलाव

नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदेड तालुक्यातील शासकीय डेपोमधीलशिल्लक रेतीसाठयाचा जाहिर लिलाव शुक्रवार १९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वा. उपविभागीयअधिकारी कार्यालय, चिखलवाडी परिसर नांदेड येथील कार्यालयाचे सभागृह येथे करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यास इच्छूक व्यक्तींनी ओळखपत्रासह विहीत तारखेस उपस्थित राहावे, असेआवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.
नांदेड तालुक्यातील शासकीय रेती डेपोमधील शिल्लक रेतीसाठा पुढीलप्रमाणे आहे. मौ. रहाटी जुने वाघीता. नांदेड 38 हजार 712 उपलब्ध रेतीसाठा असून हातची किंमत 2 हजार 767 रुपये आहे. याची हातचीकिंमत 10 कोटी 71 लाख 16 हजार 104 रुपये आहे. तर खुपसरवाडी येथे 1 हजार 5 उपलब्ध रेतीसाठाअसून हातची किंमत प्रति ब्रास 2 हजार 767 रुपये आहे. तर 27 लाख 80 हजार 835 रुपये याप्रमाणेआहे.
लिलावाच्या अटी व शर्ती महसूल व वनविभागाचा 8 एप्रिल 2025 व 15 जुलै 2025 शासन निर्णया प्रमाणे राहतील. या जाहिर लिलावाच्या अटी व शर्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड वतहसिल कार्यालय, नांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत.



