Uncategorized

प्रवासी युवका कडून महिला वाहकाला मारहाण;गुन्हा दाखल

मुखेड प्रतिनिधी:- ०८ ऑगस्ट २५ 

तिकिटाचे चिल्लर पैसे  मागितले म्हणून प्रवाशाने एस टीमहिला कंडक्टरला शिवीगाळ करत थापड मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुखेड ते शिरूर बसमध्ये घडलीघटनेबाबत शिरूर आगारातील महिला वाहक महेश्वरी एकलारे वय (५०मुखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विजय बापूराव वाघमारे रा. बावनवाडी यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार महेश्वरी एकलारे या शिरूर आगारात गेल्या २२ वर्षांपासून एस.टीमहामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेतशुक्रवारी सायं ५:४५ वाजता त्यांनी चालक गोवर्धन राजाराम सूर्यवंशी सोबत मुखेड येथूनबस क्रएमएच २० बी एल १६१२ ने शिरूर साठी निघाल्या होत्यापरजात असताना कंधार फाट्यावर तिकीट बुकिंग करत प्रवाशाकडून तिकीटचे पैसे घेत असताना प्रवाशाने महिला वाहकाला शंभर रुपयाची नोट देत होते महिला वाहकाने त्याला चिल्लर पैसे द्या तेव्हा त्याने वाहकला तुम्हाला याच पैशांमध्ये तिकीटद्यावे लागेल माझे कडे सुट्टे पैसे नाहीत तेव्हा त्यांच्या सोबतची महिला मथुराबाई रघुनाथ वाघमारे राहणार बावनवाडी यांनी माझ्याकडे वीस रुपये आहेत हे पैसे घेऊन तुम्ही तिकीट घ्या अशी सांगितली तेव्हाआरोपी विजय बापूराव वाघमारे  यांने आई बाईवर अश्लील शिवीगाळ करत महिला वाहकाचा हातमुरडला  गालावर चाट मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे प्रवाशाच्या सोबतचे प्रवाशांनी सोडवा सोड केली तेव्हा विजय बापूराव वाघमारे  खिडकीतून उडी मारून रार झाला याघटनेमुळे बसमधील इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

मारहाणीनंतर चालक व महिला वाहकाने प्रवाशासह बस घेऊन पोलीस स्टेशनला झाले दाखल झालेल्या वाहक महिलेला वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मुखेड येथे पाठवण्यात आले.महिला वाहकाच्या तक्रारी नुसार आरोपी विजय बापूराव वाघमारे राहणार बावनवाडी यावर गुन्हा रजिस्टरनंबर १८८/ २०२५, १३२ ,१२१ ,२९६ कलम नुसार पोलिस उपनिरीक्षक  तुतुरवाड यांनी गुन्हा दाखल केला तर पुढील तपास पोहेके जाधव हे करीत आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button