पिसाळलेला कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दुध प्यायलेल्या १८२ ग्रामस्थांनी भीतीपोटी रुग्णालयात घेतली रेबीज लस

मुखेड प्रतिनिधी:-०७ ऑगस्ट २५
मुखेड लुक्यातील बिल्लाळी येथील शेतकरी रामदास किशन इंगळे यांच्या म्हशीचा पिसाळलेले कु्त्रा चावल्याने मृत्यू झाला होता . यानंतर बिल्लाळी गावातील त्या म्हशीचे दूध प्यायलेल्या १९० ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. या म्हैशीचे वापरणाऱ्या त्या १९० ग्रामस्थांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुखेड तालुक्यात बिल्लाळी हे गाव आहे. या गावातील रामदास किशन इंगळे शेतकऱ्याच्या म्हशीला पिसाळलेला कु्त्रा चावला होता ३ दिवसापूर्वी ही म्हैस मृत्यूमुखी पडली आहे. त्या म्हशीला रेबीज आजार झाल की काय या शंकेने भीतीचे वातावरण पसरले. गावातील नागरिक या म्हैशीचे दुध आपल्या घरी वापरत होते. या म्हशीचे दूध घेवून जाणाऱ्या नागरिकांना ही माहिती कळताच त्यांची बोबडीच वळली. या भीतीपोटी गावातील १८२ ग्रामस्थांनी रेबीज लस घेण्यासाठी बिल्लाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासह राजुरा, येवती, बारहाळी, देगलूर रूग्णालयात १८२ ग्रामस्थांनी रेबीज लस घेण्यास गर्दी केली होती. या वेळी डॉ.प्रणिता गव्हाणे,धुळगंडे सिस्टर,जाधव सिस्टर लस देत उपचार केला




