Uncategorized

होनवडज येथे रामनवमी निमित्त जंगी कुस्त्यांचे सामने रंगले.

मुखेड / प्रतिनिधी.

मुखेड तालुक्यातील मौजे  होनवडज येथे श्रीराम नवमी  निमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.बहुतांशी गावातून पहेलवान सहभागी झाले होते.रंगतदार कुस्त्यांचे सामने प्रेक्षकांना पहावयास मिळाले.आखेरची कुस्ती माजी जि.प.सदस्य प्रतिनिधी विजय पाटील सुगावकर यांच्या वतीने ठेवण्यात आली होती.शेवटच्या कुस्तीचे ७०५१ रूपयाचे प्रथम  पारितोषिक विजय पाटील सुगावकर यांच्या हस्ते पहेलवान वाघमारे यांना देण्यात आले.
 मुखेड तालुक्यातील मौजे  होनवडज येथे श्रीराम नवमी  निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी  जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शेवटच्या कुस्तीसाठी उदगीर येथील पहेलवान वाघमारे व बाळू रातोळीकर यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला यात वाघमारे यांनी मान बाळूला चित करुन प्रथम पारितोषिक पटकवला आहे.यावेळी होनवडज ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच प्रतिनिधी कुणाल कांबळे,पोलीस पाटील शंकर पाटील जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटील जाधव, सेवानिवृत्त गटशिक्षणधिकारी माकणे,माजी सरपंच नागनाथ पाटील जाधव,चेअरमन गंगाधर पाटील जाधव,विठ्ठल पाटील जाधव,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर गोविंराव जाधव, उपसरपंच संतोष पाटील जाधव,पिपळकुठ्याचे सरपंच पांडुरंग पाटील गोपनर सह होनवडज व परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button