राजकीय

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाऱ्हाळी येथे जाहीर सभा

मुखेड प्रतिनिधी:- 

विधानसभा निवडणुकीनंतर नांदेडमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेशाची चढाओढ लागली आहे

विशेष म्हणजे ही चढाओढ भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात होत आहे

उद्या दि ११ मे रोजी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे आयोजित जाहीर सभेत शिवशंकर जय साखरकारखान्याचे माजी अध्यक्ष शेषेराव चव्हाण आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचा  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहेही माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिलीत्यांनी सांगितले कीनांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी मोठा संकल्प हाती घेतला आहे आणि आतापर्यंत ९०हजार सदस्यांची नोंद झाली असून हा आकडा लवकरच लाखाच्या पुढे जाईलअसा विश्वास त्यांनीव्यक्त केलाया जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेनाइंद्रनील नाईकरूपाली ताई चाकणकर यांच्यासह विविध स्तरांतील नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेतशेषेराव चव्हाण यांच्यासोबत बाबुराव पवित्रेअण्णासाहेब जहिरेदिलीप कोटगिरे यांचाही पक्षप्रवेशहोणार आहेया कार्यक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय शक्तीला नवे बळ मिळेलअसा अंदाज व्यक्त केला जात आहेया पत्रकार परिषदेस माजी आमदार मोहन हंबर्डेअविनाश घाटेजिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारीव्यंकटराव पाटील गोजे– गावकरप्राउदय चव्हाणमुक्तेश्वर धोंडगेशिवराज पाटील होटाळकरपठाणवैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button