शैक्षणिक

मुखेड तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदावर हमीद दौलताबादी रुजू

मुखेड -(ता. प्रतिनिधी) ३० मे २५

मुखेड तालुक्यात तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी होनधरणे कैलास कार्यरत होते. त्यांची बदली किनवट तालुक्यात झाल्याने मुखेड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदावर हमीद दौलताबादी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रुजू झाले.
हमीद दौलताबादी प्रभारी गटशिक्षणाधिकारी हे मुळ आपल्याच मुखेड तालुक्याचे रहिवाशी असून मागील पंचवीस वर्षापासून शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत आहेत. ते एम.एससी ,एम.एड. उच्चशिक्षीत असून मागील 6 ते 7 वर्षे हिमायतनगर, देगलूर, बिलोली तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचे उत्कृष्ट पदभार सांभाळलेले आहेत. त्यांच्या सेवेत उत्कृष्ट काम केल्याबाबत दोन वेतनवाढ मिळाले आहे.
हमीद दौलताबादी हे आपल्या तालुक्यात सेवेसाठी उपस्थित झाले ही अतिशय आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्या नेतृत्वाची आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेचा ठसा पूर्वापारच उठून दिसणार आहे. आपल्या कार्यपध्दतीत सुयोजित, कामाची शिस्त, विद्यार्थ्यासाठीचा आपुलकीचा दृष्टीकोन, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची आणि शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याची जिद्द हे सर्वच कौतुकास्तक आणि प्रेरणादायी आहे. नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळांमध्ये उपक्रमशिलता वाढविणे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासावर भर देणे. यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आले आहे.
मुखेड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेत नवे बळ, नवी दिशा आणि नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button