दु:खद वार्ता; पत्रकार मिलिंद कांबळे यांचा मुलगा इंजि.पवन कांबळे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन

मुखेड प्रतिनिधी:- ३१ मे २५
पत्रकार अॅड.मिलिंद कांबळे येवतीकर यांचा मुलगा इंजि.पवन मिलिंद कांबळे येवतीकर (वय २७) यांचे शुक्रवारी दि.३० मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ह्दयविकाराच्या झटक्याने पुणे येथे दु:खद निधन झाले आहे
त्यांच्या पश्चात आई ,वडील ,एक बहीण ,असा परिवार आहे.
मिलिंद कांबळे आपल्या कठीण परिश्रमातून मुलाला अभियांत्रिकी शिक्षण दिले होते अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर पुणे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिक्षण चालू होता त्यातच काळाचा घाला पवनचे स्वप्न अपुरे राहिले.
त्यांच्या पार्थिवावर आज १२.३० वाजता मुखेड येथील मोती नदी कौठा रोड स्मशानभूमीत अंतिम संस्कारकरण्यात येणार आहे.
पवन कांबळे हुशार,शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचा होता , त्यांच्या अचानक जाण्यामुळे, संपूर्ण मुखेड हळहळला आहे.
पवन यांच्या जाण्याने श्रमिक एकता न्यूज़ परिवार दु:ख व्यक्त करत आहे . श्रमिक एकता न्यूज़ परिवारकांबळे यांच्या परिवाराच्या दु:खात सामिल आहे.



