पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या मदतीने तरुणाचा खून

▫️१२ तासांत दोघांना अटक – पोलिसांची वज्रकार्यवाही
▫️पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले तपास पथकाचे विशेष कौतुक
हदगाव :- ०५ जुलै २५
हदगाव तालुक्यातील ढोरळी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राचा खून केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास काटेकर या व्यक्तीला संशय होता की त्याच्या पत्नीचे आपल्या मित्रासोबत अनैतिक संबंध आहेत. या रागातून त्याने काही मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तीला दारूच्या नशेत ठार मारले.
हत्या केल्यानंतर मृतदेह गावाजवळ फेकण्यात आला. पोलिसांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने पोलिसांसमोर सांगितले की, दारूच्या नशेत त्यांनी हा गुन्हा केला.
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस धागादोरा नसतानाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांच्या तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि साक्षीदारांच्या माहितीवरून केवळ १२ तासांच्या आत दोघा आरोपींना अटक केली. या जलद आणि अचूक कारवाईबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.



