जन्म-मृत्यू नोंदीच्या प्रमाणपत्रासाठी तहसीलदारांना आदेश द्यावा:- बालाजी आईलवाड
मुखेड : प्रतिनिधी
जन्म मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका दंडाधिकारी तहसीलदार यांना आदेश पारीत करावे अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे शिवसेनेचे मुखेड उपतालुका प्रमुख अॅड बालाजी आईलवाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून ई–मेलद्वारे केली आहे.
जन्म व मृत्युचे प्रमाणपत्र यापूर्वी तहसिल कार्यालयातून तालुका दंडाधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जात होते. पण मध्यतंरीच्या काळात शासनाच्या वतीने जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्थगिती देण्यात आली होती. या निर्णयामुळे नागरिकांची मोठी गोची झाली कारण आधार काढण्यासाठी, आधारमधील नाव दुरूस्ती, जन्मतारीख दुरूस्ती व इतर महत्वाच्या कामासाठी जन्मप्रमाणपत्र हे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे जन्म–मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिक संबंधित कार्यालयाभोवती चकरा मारत आहेत. याबबातीत शासनाने पुन्हा जीआर काढले आहे पण त्या जीआर(आदेशाची) अद्याप अमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही. जुन महिण्याच्या सुरुवातीला शैक्षणिक संस्थाना (शाळेत) प्रवेश घेण्यासाठी जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे. त्या करीता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन आपण संबंधीत कार्यकारी तालुका दंडाधिकारी यांना तात्काळजन्म– मृत्यू नोंद प्रमाणपत्र देण्यासाठी आदेशीत करावे. कारण शासनाने यासंदर्भात जीआर काढले तोजिआर अद्याप अंमलात आले नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तहसीलदार यांना आदेशितकरण्याची मागणी शिवसेनेच तालुका उपप्रमुख बालाजी आईलवाड यांनी केली आहे. जर असेच यापुढेचालत राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कधी न भरुन येणारे होईल याची जाणीव ठेवून निर्णय घ्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर विद्यार्थ्यांना घेवून मोर्चा काढण्यात येईल असा इशा– राही आईलवाड यांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.



