सेवानिवृत्त मु. अ. विठ्ठलराव वाघजी भायेगावे अंबुलगेकर गुरुजी यांचे निधन!

मुखेड प्रतिनिधी : ११ जून २५
अंबुलगा बुद्रुक येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव वाघजी भायेगावे वय वर्ष ७७ यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
स्वर्गीय विठ्ठलराव भायेगावे गुरुजी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे.
उद्या दिनांक 12 जून गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता अंबुलगा ता.मुखेड जि.नांदेड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग पतसंस्थेचे संचालक तथा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष विठ्ठलराव
आंबुलगेकर यांचे वडील तर सामाजिक न्याय विभागाचे अधिक्षक श्री गणेशराव भायेगावकर व दिलीप कदम माकणीकर व प्रहार न्यायमंच आश्रम शाळा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद पाटील नकाते यांचे ते सासरे होत.



