एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले.

विमानात २४२ प्रवासी होते. त्यापैकी ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता.
भावी डॉक्टरांच्या भरल्या ताटावर आला मृत्यू
एअर इंडियाकडून आपत्कालीन नंबर जारी
गुरूवारची दुपार संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखद ठरली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुपारी 1.30 च्यासुमारास लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथून एअरइंडियाच्या विमानाने टेकऑफ केलं खर पण अवघ्या १० मिनिटांतच हे विमान शहरातील नागरीवस्तीतील एक इमारतीला धडकून खाली कोसळलं आणि आगीचे लोळ उठले, प्रचंड मोठा स्फोट झाला आणि एकच कल्लोळ माजला यावेळी विमानात सुमारे २४२ प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान आता या अपघातानंतर एअर इंडियाकडून एक आपत्कालीन संपर्क क्रमांक अर्थात हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. एअर इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइनक्रमांक १८०० ५६९१ ४४४ हा सुरू करण्यात आला आहे. या अपघातातत होरपळलेल्या लोकांना, जखमी प्रवाशांना जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे असे एअर इंडियाने सोशल मीडियासाइट एक्स वरील पोस्टमधये नमूद केलं आहे.

अहमदाबादहून गुरूवारी दुपारी १ लाजून ३८ मिनिटांन निघालेल्या बोइंग ७८७-८ या फ्लाईटमध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिकआणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत असल्याचे एअरलाइननेम्हटले आहे. एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (https://x.com/airindia) आणिhttp://airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती प्रसिद्ध करणार आहे.




