राजकीय

नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत राहणार ६५ गट

नांदेड प्रतिनिधी:-  १३ जून २५

राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्यासार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहेयामध्ये नांदेड जिल्ह्यात ६५ गटांमध्ये निवडणूक होणार असून या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे असे एकूण १३० गण निवडले जाणार आहेतनांदेड जिल्ह्यात सर्वाधिक  गट मुखेड तालुक्यात राहतील तर किनवटहदगावलोहा आणि कंधार यातालुक्यात प्रत्येकी  गटांचा समावेश करण्यात आला आहे.

या गटांची रचना आता करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहेजिल्ह्यात आता स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहेप्रशासनाकडून होणाऱ्या या प्रभाग रचनावॉर्डरचनागट आणि गण रचनेकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे२०११ च्या जनगणनेनुसार हीनिवडणूक होणार आहेयामध्ये नांदेड जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या ही २४ लाख १६ हजार १८४ इतकी आहेत्यामध्ये अनुसूचित जातीचीलोकसंख्या ही  लाख ७७ हजार २३ आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या  लाख ४० हजार २७४इतकी आहेया लोकसंख्येवर आधारित गट आणि गण रचना तयार करून त्याबाबतचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे.

जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभागामध्ये आणि पंचायत समीक्षक समिती क्षेत्राचे निर्वाचन गणांमध्ये विभाजन करणेत्यांच्या सीमा निश्चित करून त्यांचे प्रारूप तयार करणे याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला तहसीलदार अशा अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी राहणारआहेनिर्वाचक गणरचनेचे प्रारूप जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतीलनिवडणूक विभाग आणि निर्वाचक गणरचनेच्या प्रारूपावरील हरकती आणि सूचना जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार दर्जापेक्षा कमी नाही असेअधिकारी स्वीकारतीलजिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचनया संबंधी प्रारूप प्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनावर सुनावणी घेऊन राज्य निवडणूकआयोगाने किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषद क्षेत्राचेनिवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचक गण अंतिम करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे राहणार आहेत्याचवेळी जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचकगणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतीलहे सर्व आदेश राज्याचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button