कै. माधवराव मुद्देवाड यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प; मित्र परिवाराकडून अभिवादन

मुखेड / प्रतिनिधी :– श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६
कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि आयुष्यभर समाज हितालाच आपले ध्येय मानणारे कै. माधवराव मुद्देवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कै. मुद्देवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
कै. माधवराव मुद्देवाड हे केवळ एक नेते नव्हते, तर शेकडो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. या अभिवादन कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला. “कै. मुद्देवाड यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी केलेले कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. तसेच, त्यांनी घालून दिलेला विचारांचा वारसा आणि समाजकार्याची शिदोरी पुढील पिढीपर्यंत अधिक सक्षमपणे पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला.
या कौटुंबिक आणि सामाजिक अभिवादन कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पत्रकार सुनील पौळकर, संदीप पिल्लेवाड ,राजेश गुडमेवाड, शिवा मुद्देवाड, उद्धव नागरवाड, साईनाथ बोईनवाड, बालाजी मंगेवाड, रामभाऊ पांचाळ, बालाजी भांगे, संतोष घाळेवाड, साई भांगे या सर्व मान्यवरांनी कै. माधवराव मुद्देवाड यांच्या आठवणींना उजाळा देत, समाजहितासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यावर प्रकाश टाकला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा अभिवादन सोहळा संपन्न झाला.



