Uncategorized

नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोटार सायकलसह चार चोरांना गजाआड केले

नांदेड प्रतिनिधी – ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरांना मोटरसायकल पकडून गाजाआड केल्याची घटना २३ रोजी घडली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली असून या चोरांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा पोलीस स्टेशन उपविभाग नांदेड सुशील कुमार नायक सूचना दिल्या असता नांदेड येथील प्रभारी आधीकारी श्रीकर जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील आनंद बीचेवर, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ वाकडे, जाधव, मालदोडे, पोना शेख सत्तार, मुंडे, पोकॉ स्वामी, बेल्लूरोड, माने, तेजबंद, दासरे यांना सुचना देऊन प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार आरोपींचा शोध घेण्याचे सांगितले असता गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी वैभव गणपतराव पिदागे (२२) रा. अमृतनगर पूर्णा, त.पूर्णा जि. परभणी यास ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर सदर गुन्ह्यातील एक आणि इतर तीन अशा चार मोटारसायकली काढून दिल्या. यामध्ये हिरो होंडा कंपनीची एम एच २६, एस ३८५६ किंमत ३० हजार, हिरो होंडा कंपनीची वीना नंबरची किंमत ४० हजार, हिरो होंडा स्प्लेंडर एमएच २६ ईव्ही ९९९५ किंमत ७० हजार रुपये, होंडा कंपनीची कळ्या रंगाची एमएच २६ यु १३०१ किंमत ५० हजार रुपये असे एकूण १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या चार मोटार सायकलसह आरोपीला पोलिसांनी तब्येत घेतले आहे.
या कामगिरी बाबत नांदेड ग्रहांच्या गुन्हे शोध पथकातील टीमचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा नांदेड सुशील कुमार नायक यांनी अभिनंदन केली आहे. या कारवाईमुळे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटरसायकल चोरांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button