एक दिवसीय मोफत मेगा मेडिकल कॅम्प शिबिरात ८०० हून अधिक रुग्णांची तपासणी

▫️नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि उम्मीद हेल्पलाइन सेंटरच्या वतीने शिबिराचा आयोजन
नांदेड प्रतिनिधी:- १४ जुलै २५
नांदेड येथे दि १३ जुलै रोजी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि उम्मीद हेल्पलाइन सेंटर द्वारे मोहम्मदिया फंक्शन हॉल, खुदबाई नगर, नांदेड येथे एक दिवसीय मोफत मेगा मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लव्हेकर हॉस्पिटल, नांदेड सिव्हिल हॉस्पिटल, क्षितिज हॉस्पिटल, आशाहॉस्पिटल आणि स्वामी विवेकानंद हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी आणि उपचार केले. याशिबिरात ८०० हून अधिक रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले,

तसेच मोफत औषधे, मोफत शुगर तपासणी , मोफत ईसीजी, मोफत स्पायरोमेट्री चाचणी आणि थायरॉईड चाचणी फक्त ५०रुपयांमध्ये करण्यात आली. यावेळी या शिबिराचे आयोजक अब्दुल बशीर मजीद आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी सय्यद इक्बाल कैसर साहिब यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात पुष्पअर्पण केले.

या शिबिराची सुरुवात मुफ्ती शोएब साहिब यांच्या प्रार्थनेने झाली. या शिबिरात प्रमुख निजामाबाद येथील राणा तबस्सुम, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार, माजी नगरसेवक साबीर चाऊस, माजी नगरसेवक रहीम खान, अहमर नदीम, मोहम्मद शफीक, मोहम्मद वसीम, अल्तमश तालिब, ॲडरशीद पटेल, अथर सुनार, सय्यद कैसर फरेज इक्बाल, सैय्यद कैसर, फर्ज़े, अदहर, ॲड. ॲड अली आर्यन, मोहम्मद विकार सहभागी झाले होते.

महिला विंगच्या फरहाना शेख आणि राहिन बेगम यांनी हे शिबिर यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिकाबजावली आणि त्यांच्यासोबत शेख मजहर, मोहम्मद शहाब, मोहम्मद वसीमुद्दीन, शेख सोहेल, अब्दुल्लामोमीन मोहम्मद अझीमुद्दीन आणि शेख खलील यांनीही हे शिबिर यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.



