रोबोटिक प्रक्रियेने ब्रेन ट्यूमरवर उपचार! यशोदा हॉस्पिटल सिंकदराबादच्या डॉक्टरांचे यश

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण बरा होण्याचाकालावधी कमी ः न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण
नांदेड प्रतिनिधी :- १९ जून २५
३० वर्षीय तरुणावर रोबोटिक असिस्टेड ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करीत यशोदा हॉस्पिटलसिंकदराबाद येथील डॉक्टरांनी मेंदूविकार शस्त्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञान वापरत ४ सेमी च्या ब्रेन टयुमरनेग्रस्त तरुणाला शस्त्रक्रियेमध्ये अचूकता साधत, कमीत कमी छेद देण्यावर भर दिला यामुळे रक्तस्त्रावकमी होऊन रुग्ण बरा होण्याचा कालावधीही कमी झाला अशी माहीती सिंकदराबाद चे न्युरोसर्जनडॉ.के.एस.किरण यांनी पत्रकार परिषेदेत दिली
नांदेड जिल्हयातील पाळज ता. भोकर येथील श्रीकांत आलेवाड या तरुणांस गाडीवरून पडल्यानेडोक्याला मार लागल्यामुळे नांदेड येथील डॉक्टरांच्या सल्यानुसार यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथेदाखल करण्यात आले होते. त्यांच्या तपासणीत ४ सेमी आकाराच्या ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. त्यातीलगुंतागुंत आणि ट्यूमरचे ठिकाण लक्षात घेता न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीयपथकाने रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. या अत्याधुनिक तंत्राद्वारे ट्यूमरला अचूकतेनेलक्ष्य करणे शक्य झाले. याचबरोबर आजूबाजूच्या पेशींना होणारे नुकसान कमी झाले. या प्रक्रियेसाठी९० मिनिटांचा वेळ लागला.
ही प्रक्रिया पारंपरिक ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियांपेक्षा खूपच कमी वेळात पार पडली. पारंपरिक प्रक्रियेमध्येअनेकदा मोठे छेद समाविष्ट असल्याने रुग्णाचे रूग्णालयातील वास्तव्य जास्त असते. परंतु रोबोटिकअसिस्टेड तंत्रामुळे कमीत कमी छेद आणि अधिक कार्यक्षम शस्त्रक्रिया प्रक्रिया करणे शक्य झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर बारकाईने देखरेख ठेवण्यात आली. रुग्णाला २ आठवड्यानंतर रुग्णालयातूनघरी सोडण्यात आले. रोबोटिक असिस्टेड प्रक्रियेमुळे रुग्णाची प्रकृती जलदरित्या सुधारत आहे.
न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण म्हणाले की, रोबोटिक प्रणालीने शस्त्रक्रियेतीलअचूकता लक्षणीयरित्या वाढवता येते. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सक मेंदूच्या नाजूक संरचनेतूनअचूकतेने मार्ग काढू शकतात व यामुळे प्रक्रियेची एकंदर कार्यक्षमता सुधारते. अधिक अचूकतेमुळेगुंतागुंतीचा धोका कमी होतो व रुग्णांना असुरक्षित व चांगले परिणाम मिळतात. याशिवाय रोबोटिकप्रणालीमुळे कमीत कमी छेद, कमी वेदना, रुग्णालयात कमी वास्तव्य शक्य होते. यामुळे रुग्ण लवकरबरा होऊ शकतो.



