सामाजिक

डॉ.राजासिंह चौव्हाण यांना स्मृ‌तिदिन्न‌निमित्त मुखेडमध्ये विविध कार्यक्रमासह अभिवादन.

मुखेड / प्रतिनिधी. ११ जुलै २५

    पंचायत समिती  कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै.डाॅराजासिंह हरीसिंह चौव्हाण यांच्या २५ व्या स्मृ‌तिदिन्न‌निमित्त दि.०९ जुलै रोजी मुखेड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात  आयटीआय काॅलेज,उपजिल्हा रुग्णालय,कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये,  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.डाॅ.राजासिंह चौव्हाण यांच्या स्मृ‌तिदिन्न‌निमित्त आयटीआय काॅलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह,लेखणी,शालपुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.त्यानंतर तिथे वृक्ष लागवड करण्यात आले व तसेच उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे रुग्णांना डॉ. टाकसाळे,तोटावाड,यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.

    आयटीआय काॅलेजमध्ये आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एस.खोचरे हे होते तर प्रमुखअतिथी म्हणुन संस्था व्यवस्थापन समितीचे  सदस्य जेष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे,अल्लाप्रसाद कांबळेदशरथ रोडगे,माजी नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार,राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तालुकाध्यक्ष आसद बल्खीशिवाजी पाटील अंबुलगेकरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळेमुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख

नामदेव नोमूलवार,आरुणसिंहचौ्हाण,सतीशसिंह चौहानयुवराजसिंह चौव्हान,प्रतापसिंह चौव्हान,संजयसिंह चौव्हानसतीशसिह,चौव्हान,स्वप्नीलसिंहचौव्हानदिपराजसिंह चौव्हानगजानन शंकर आकुलवाड,लोहाळे,संदीप,एस.सी.पवार,डी.एमघोपे,आर.एम.चव्हाण,डी.आरगायकवाड,एम.एन.पाटील,एमवाय.भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्तेगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला  त्यानंतर काॅलेजच्या प्रागंणात वृक्षारोपन करण्यात आले.स्वातंत्र्य सेनानी राजासिंह हरिसिंह चौव्हाण शासकीय औद‌योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षिका,पंचायत समिती कार्यालयातील अधिकारीकर्मचारी,आयटीआयकाॅलेजचे विद्यार्थी  चौव्हाण परिवारातील सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक विनोद आडेपवार यांनी केले तर प्रस्ताविक संपादक जयभिम सोनकांबळेयांनी केलेउपस्थितांचे आभार सतिशसिंह चौव्हाण यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी चौव्हाण परिवाराने परिश्रम घेतले 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button