आयडीबीआय बँक शाखा व्यवस्थापकाचे अपघाती मृत्यू; सोमवारी होता विवाह सोहळा

हदगाव:- ०७ जुलै २५
लोहा येथे नुकतेच बदली झालेले आयडीबीआय बँकेचे मॅनेजर आशिष देशमुख (वय ३०) यांचा कवठा गावाजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास नांदेड–नागपूरराष्ट्रीय महामार्गावर हदगाव तालुक्यातील कवठा गावाजवळ घडली. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी लाधडक दिली. देशमुख मूळचे वाशिम जिल्ह्यातील असून सोमवारी त्यांचा विवाह सोहळा होणार होता. ते अविवाहित असून कुटुंबातील एकुलता एक मुलगा होते. अपघातावेळी रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कामाचीमाती फेकलेली होती आणि हलक्या पावसात हेल्मेटमुळे दृश्यता कमी झाल्याचा अंदाज वर्तवला जातआहे.
आशिष देशमुख यांच्या पश्चात कुटुंबामध्ये आई,दोन बहिणी, काका, काकू, भावंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आशिष देशमुख हेकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भैय्यासाहेब देशमुख, डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्षडॉ,अरुण देशमुख यांचे पुतणे आहेत.
आशिष च्या अकाली निधनाची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी एकच टाहो फोडला आषाढीएकादशीच्या पूर्वसंध्येला त्याचे निधन झाल्याने गावकऱ्यांनी आषाढी एकादशी साजरी केली नाही.



