वानराच्या पिल्याचे मृत्यू ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कार

मुखेड प्रतिनिधी:- १० जुलै २५
मुखेड तालुक्यातील उमरदरी येथे दि १० जुलै रोजी गुरुवारी संध्याकाळी वानराच्या पिल्याचे गावातील मरुमायच्या वाट्यावर चिंचेच्या झाडावरून खाली पडल्याने पिल्याचे जागीच मयत झाले़ ग्रामस्थांनी त्याची अंत्ययात्रा काढण्याचे ठरविले़ ही वार्ता परिसरातील गावात पसरली़ अन् या माकडाच्या अंत्ययात्रेत जनसमुदाय सहभागी झाला़

गावात एखादी व्यक्ती मयत झाली की, अख्ख गाव अंत्ययात्रेसाठी एकत्रित येते, त्याप्रमाणे गावातील बालगोपाळा पासून ते वृद्धापर्यंत त्या मृत माकडाला पाहण्यास येत होते़ माणसाप्रमाणे त्या मृत माकडासविधीवत अंघोळ घालून, मयतीचा कपडा, टॉवेल–टोपी, असा संपूर्ण आहेर करून पुष्पहार घालून, बँड लाऊन गाजत वाजत अंत्ययात्रा काढण्यात आली़ यात शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते़
गावातील रावसाहेब पाटील उमरदरीकर यांच्या शेतात त्याचे दफन करण्यात आले़



