Uncategorized
एकलारा गणातून सौ.कोमल गजानन त्यांगमपुरे चोंडीकर निवडणूक लढविण्यास इच्छुक.

मुखेड / प्रतिनिधी.१ नोव्हेंबर
मुखेड-कंधार मतदारसंघाचे आ.डॉ.तुषार राठोड यांनी संधी दिल्यास एकलारा पंचायत समिती गणातुन माझी पत्नी सौ. कोमल गजानन त्यांगमपुरे चोंडीकर ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे गजानन त्यांगमपुरे यांनी श्रमिक एकता न्यूज शी बोलताना सांगितले.
तालुक्यातील एकलारा पंचायत समिती गण हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आरक्षण जाहीर झाले आहे.त्यामुळे या प.स.गणातून निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून आ. डॉ.तुषार राठोड यांनी संधी दिल्यास जनतेची सेवा करण्यासाठी पूर्ण ताकतिनिशी निवडणूक लढवणार असल्याचे चोंडी येथील युवा कार्यकर्ते गजानन त्यांगमपुरे यांनी सांगितले आहे.गजानन त्यांगमपुरे हे प.स.गणांत्त परिचित असून एकलारा गणातील गावागावात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे व सर्व समाज बांधवाशी त्यांचा चांगला संपर्क आहे. ते धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमात नेहमी सहभागी घेत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांगमपूरे हे आमदार डॉ.राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून आजतगायत भाजपाशी जोडले गेले आहेत.

गोरगरीब सामान्य माणसाला आपलेसे वाटणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात.त्यांनी दरवर्षी गरजु, होतकरु विध्यार्थ्यांना स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य वाटपाचे समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा कार्यक्रमाचेही आयोजन करतात त्यामुळे एकलारा गणातील जनतेची एकच मागणी होत असून भाजपाच्या वतीने त्यांगमपूरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.आ. तुषार राठोड यांनी भाजपाच्या वतीने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवू असे श्रमिक एकता न्यूज शी बोलताना गजानन त्यांगमपुरे यांनी सांगितले.



