मुखेड नगरपरिषद छाननीत शिवसेना (शिंदे गट) उमीदवारांचे अर्ज राखीव

▫️6 वाजता निर्णय न झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांत नाराजी
▫️साडेआठ वाजता घेतलेला निर्णय फलकावर लावला
▫️निर्णयात उशीर; उमीदवारांचा तीव्र असंतोष — अखेर सर्व उमेदवार पात्र
मुखेड प्रतिनिधी:- १९ नोव्हेंबर
मुखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान मंगळवारी मोठी हालचाल पाहायला मिळाली. शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जांवर भाजपाकडून आक्षेप नोंदवल्यानंतर छाननी अधिकाऱ्यांनी हे सर्व अर्ज राखीव ठेवले. छाननी दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले होते की“संध्याकाळी सहा वाजता निर्णय दिला जाईल.
ठरलेल्या ६ वाजेच्या वेळेला कोणताही निर्णय न झाल्याने उमीदवार व कार्यकर्त्यांमध्येअसंतोष,संभ्रम,तणाव असे वातावरण निर्माण झाले. छाननीच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थितकरण्यात आले.
संध्याकाळपासून झालेल्या प्रतिक्षेनंतर रात्री साडेआठ वाजता छाननी समितीने तांत्रिक तपासणी पूर्णकरून निर्णय अंतिम केला. त्यानंतर हा निर्णय थेट निवडणूक कार्यालयातील फलकावर लावण्यात आला.
यामध्ये सर्व शिवसेना (शिंदे गट) उमेदवार पात्र ठरल्याची नोंद करण्यात आली.
निर्णयात झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या नाराजीचे वातावरण अखेर निर्णय जाहीर होताच उत्साहात बदलले.
उमेदवारांची प्रतिक्रिया “सहा वाजता निर्णय देणार सांगूनही उशीर झाला, त्यामुळे प्रक्रियेबाबत शंकानिर्माण झाली होती.”
दिवसभर चर्चांना उधाण भाजपाने नोंदवलेले आक्षेप ,निर्णयातील विलंब ,कार्यालयातील वाढलेली गर्दी आणि शेवटी रात्री लागलेला निर्णय या संपूर्ण प्रक्रियेमुळे मंगळवारी दिवसभर मुखेड शहरात राजकीय चर्चांना उधाण आले. यामुळे आगामी नगरपरिषद लढत अधिक चुरशीची होईल, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.



