Uncategorized

मुखेडच्या पोस्टात अपुरे मनुष्यबळ; कामाचा ताण वाढला ; विलंब सेवेमुळे नागरिकांची गैरसोय

मुखेडः प्रतिनिधी 28 डिसेंबर

मुखेड शहराची झपाट्याने बाढत चाललेली लोकसंख्याविस्तारणाऱ्या वसाहती आणि वाढती व्यापारी उलाढाल लक्षात घेता येथील डाकघरात किमान चार टपाल सेवकांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोनच टपाल सेवक कार्यरत आहेतत्यामुळे टपाल वाटपपार्सल वितरण तसेच आर्थिक व्यव– हारांवर मोठा ताण येत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहेमुखेड डाक घरासाठी तातडीने दोन नवीन टपाल सेवकांची नियुक्ती करावी  कार्यालयात अपुरे असलेले मनुष्यबळ भरती करुन पूर्ण करण्याचीमागणी ग्राहक  सुज्ञ नागरिकांतुन होत आहे.

मुखेड डाकघरा मार्फत दररोज सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार होतातसक ाळी आठवाजल्यापासून ग्राहकांसाठी पैसे काढण्याची  इतर आर्थिक सेवांची सुविधा उपलब्ध करून दिली जातेया कामासाठी सध्या ग्रामीण टपाल सेवकांची मदत घेतली जातेमात्र नवीन टपाल सेवकांची नियुक्तीझाल्यास ते आर्थिक व्यवहारांमध्ये मदत करू शकतील आणि ग्रामीण टपाल सेवकांना त्यांच्या मूळजबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडता येतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहेसध्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेअॅमेझॉनफ्लिपकार्ट सारख्या खासगी कंपन्याजलद पार्सल वितरण करत असताना डाक घरातून येणारी पार्सलही वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन टपाल सेवकांसमोर उभे आहेमात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे टपाल सेवकांना प्रचंड धावपळकरावी लागत आहेत्यामुळे कामाचा ताण वाढून सेवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याने येथीलटपाल कार्यालयात कर्मचारी वाढविण्याची नितांत गरज असल्याचे ग्राहकांतून बोलेले जात आहेमुखेड शहराची व्याप्ती सुमारे दोन किलो मीटर परिसरात पसरलेली आहे.या परिसरात शाळामहाविद्यालयेप् प्रशासकीय कार्यालयेबँकावाढीव वस्ती तसेचअसंख्य व्यापारी प्रतिष्ठाने एकूणच मुखेड शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता डाकघरात तातडीने दोनअतिरिक्त टपाल सेवकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहेयामुळे टपाल  पार्सल वितरण वेळेतहोईलआर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेलअशी आशा व्यक्त केली जात आहेत्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता संबधितविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष घालुन टपाल सेवक  अपुयाकर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button