क्राईम

पिता पुत्रांच्या आत्महत्तेस जबाबदार महाराष्ट्र ग्रामीण बॅकेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा

बिलोली दि.१३ (प्रतिनिधी) मिनकी येथे शेतकरी पितापुत्रांनी केलेल्या आत्महत्ते नंतर शेतकरी चळवळीतील नेत्यांनी मिनकी येथे भेट देऊन महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेवर आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन पिडीत कुटुंबियांना तातडीने पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली असुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दि.९ रोजी मिनकी येथील ओमकार पैलवार व त्याचे वडील राजेंद्र पैलवार यांनी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. संक्रांतीला शाळेतुन घरी आलेल्या ओमकार याने आपल्या वडीलांना शाळेसाठी पुस्तके कपडे व मोबाईल ची मागणी केली होती.
सततची नापिकी व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने थकीत कर्जासाठी दिलेल्या नोटीसी मुळे तणावात असलेल्या राजेंद्र पैलवार यांनी ओमकार याला तुरीच्या पैशांवर मोबाईल व कपडे घेऊन देण्याचे आश्वासन दिले पण त्यामुळे नाराज झालेल्या ओमकार याने रात्री शेतातील झाडास गळफास लावुन आत्महत्या केली. सकाळी ओमकार घरी न परतल्याने शोधाशोध करणाऱ्या राजेंद्र पैलवार यांना ओमकारचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्यावर उद्विग्न झालेल्या राजेंद्र यांनी ओमकार याचा मृतदेह सोडवुन खाली उतरवला व त्याच्या आत्महत्तेस स्वतः ला जबाबदार धरुन त्याच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्राची ह्रदय द्रावक घटना घडली .
या घटनेनंतर शेतकरी चळवळीतील नेत्यांनी दि १२जानेवारी रोजी मिनकी येथे धाव घेऊन आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले . घटनास्थळी भेट ही दिली .
या आत्महत्तेस प्रामुख्याने महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची नोटीस जबाबदार असल्याचा आरोप करत बॅंकेवर आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे व पिडीत कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे . अन्यथा शासना विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे सुधीर बिंदु, शेतकरी नेते संतोष गव्हाणे,कैलास येसगे, राजु पाटील शिंपाळकर, सोमनाथ नागुरे, गणेश पाटील, सय्यद रियाज, आनंदराव ईबिराजदार,मारुती आऊलवार यांच्या सह नायब तहसीलदार परळीकर,मंडळ अधिकारी पंगे ,तलाठी चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button