मुखेड तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी;ओढे, नाले, तलाव तुडुंब : अनेक गावांचा संपर्क तुटला

▫️भवानी तांडा येथील ३५ शेळ्या, अंबुलगा, बोमनाळी येथून ७ जनावरे गेली वाहून
मुखेड प्रतिनिधी:- २८ सप्टेंबर
मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरासह मुखेड तालुक्यांमध्ये अतिवृष्टी पावसाने हाहाकार माजवलाअसून २७ रोजी पाऊसाने तालुक्यात पुन्हा जोरदार सुरुवात केली असून अनेक जनावरे अतीदृष्टीमुळेवाहून गेली आहेत. अनेक छोट्या नदी नाल्याला पुन्हा पूर आला असून शेतातल्या शिल्लक पिकांचेहीमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे.

काही गावाकडे जाणाऱ्या पुलाहून पाणी जात असल्याने तहसील प्रशासनाने पुलावर वाहतूक बंद केलीआहे तर पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तहसीलदार राजेश जाधव यांनी यांनी नुकसानग्रस्त भागातभेट देवून पाहणी केली आहे. २६ रोजी रात्री सुरू झालेला पाऊस सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होतापावसाची तीव्रता अधिक असल्याने नदी, नाल्यांना पूर आला. नदी काठ वरील अनेक गावातील घरातपाणी घुसले आहे. शहरात मोती नाल्याचा पाण्याचा प्रवाह वाढला असून फुले नगर येथील काही घरातपाणी शिरले आहे. तालुक्यात पाच महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. जांब बु. येथे ११२ मिमी, मुखेडयेथे ६७ मिमी, येवती ७१ मिमी, चांडोळा ६७ मिमी, बाहऱ्हाळी १०२ मिमी, तालुक्यात ६१ मिमी पाऊसएक दिवसात कोसळला असून आजवर ९३२ मिमी पाऊसची नोंद झाली आहे. उंद्रीप. मु. येथील विठ्ठलहुलाप्पा नांगरे यांच्या शेतातील गोठ्यात वीज पडून एक बैल दगावला तर मौजे भवानी तांडा येथेमुसळधार पावसामध्ये जयराम धनाजी पवार यांच्या जवळपास ३५ शेळ्या पुरामध्ये वाहून गेल्याअसल्याची माहिती पोलीस पाटील व पशुवैद्यकी विभागाचे गंदीगुडे यांनी सांगितले. तसेच बोमनाळीयेथील नागनाथ गोविंद होनराव यांची एक म्हैस आणि एक हलगट अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्याओढ्यात वाहून गेले. त्याचबरोबर मौजे थामणगाव तालुका मुखेड येथील मेहबूब अमीरशाह मुर्शद यांचाहलगट पुराच्या पाण्यात वाहून मयत झाला आहे. राम रघुनाथ मंत्रे यांच्या ५ मेंढ्यांचा मृत्यु झाला

मन्याड नदीला पूर आल्याने रातोळी व बेटमोगरा येथील पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. बाहाळी, निवळी येथील पुल बंद करण्यात आला आहे तर हातराळ येथील पुल वाहतूक खबर दारीचा उपाय म्हणूनबंद करण्यात आले आहेत. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी सलगरा, बेळी, चीवळी सह अनेकगावानं भेटी देवून पाहणी केली आहे.




