जिप्सी मॉर्निंग ग्रुप तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

▫️प्रशस्तीपत्र ठरले विशेष आकर्षण
मुखेड: २२ जुलै २५
जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध परीक्षेत नैपुन्य मिळवलेल्या गुणवंताचा सत्कार जोशी इन्फोटेकच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जोशी इन्फोटेकचे संचालक तथा जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी, बलभीम शेंडगे, वैजनाथ दमकोंडवार, बालाजी तलवारे यांची उपस्थिती होती. प्रारंभी विद्येची देवता माता सरस्वती प्रतिमापूज व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात व परीक्षेत नैपुण्य मिळवलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रा. डॉ. सौ. मनीषा व जय जोशी, बलभीम दशरथराव शेंडगे, चैताली दादाराव आगलावे, बालाजी वैजनाथ दमकोडवार, कृष्णा विठ्ठल बिडवई, श्लोक शंकरराव उत्तरवार, वरद सुरेश उत्तरवार, नितेश राजेश भागवतकर, अमोघ संजय गुंडावार, साई सुरेंद्र गादेकर, मयुरेश संजय गुंडावार यांचा समावेश होता. शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन पालकासह सन्मान करण्यात आला. यावेळी पंढरपूर बाळू दिंडी करणाऱ्या विठ्ठल बिडवई व अरुण पत्तेवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘जिप्सी’ चे अध्यक्ष जय जोशी यांनी करत कार्यक्रमाची भूमिका विशद केली. यावेळी प्रा.डॉ. मनीषा जोशी (देशपांडे), बलभीम शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. दादाराव आगलावे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी बालाजी दमकोंडवार, अमोध गुंडावार यांनी सत्काराला उत्तर देणारी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी तलवारे यांनी केले तर सुरेंद्र गादेकर यांनी आभार मानले. डॉ. रामराव श्रीरामे, नामदेव श्रीमंगले, जयप्रकाश चौहान, हनुमंत गुंडावार, सुरेश उत्तरवार, अरुण पत्तेवार, राजेश भागवतकर, माधव गुंडावार, उमाकांत डांगे, गोविंद पाटील, सुरेंद्र गादेकर, उत्तम अमृतवार, विठ्ठल बिडवई, आकाश पोतदार, विठ्ठलराव मोरे, सागर चौधरी, श्रीकांत घोगरे, गजानन मेहरकर, बालाजी वडजे, साईनाथ कोत्तापल्ले, बालाजीराव रेनगुंटवार, कन्हैया मिस्त्री मंडले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमात भार्गव जोशी व मृण्मयी जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी जिप्सी सदस्यांची सपत्नीक उपस्थिती होती. निष्ठांन भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



