कुरेशी समाज (खाटीक) बांधवांनी पुकारलेल्या बेमुदत बंदीचा फटका मुखेड येथील आठवडी बाजाराला बसला.

▫️सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी.
मुखेड प्रतिनिधी:- २२ जुलै २५
मुखेड येथे प्रत्येक सोमवारी जनावरांचा बाजार भरतो त्यात तालुका भरातून शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणतात पण दि. १९ जुलै पासून नांदेड जिल्ह्यात खाटीक (कुरेशी) समाजाने एक बैठक घेत जनावरे खरेदी न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला त्यामुळे भर पावसाळ्यातशेतकऱ्यांची जनावरे कोणीच विकत घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावालागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक माध्यम प्रतिनिधींना बोलताना व्यक्त करत राज्य सरकारने यामागणीकडे विशेष लक्ष देत तोडगा काढण्याची अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनकडून व्यक्त केली गेली आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले जनावरे परिवहन करताना बजरंग दल सह इतर संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यात जनावरांच्या वाहतुकीचे वाहन अडवून परिवहन करणाऱ्या लोकांना मारहाण करत परिवहन करत असलेले जनावरे पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडतआहे त्यामुळें खाटीक (कुरेशी)समाजाला आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे राज्यभर खाटीक समाजाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या वाहतूक अडवणे, अतोनात मारहाण ,शोषण आणि आर्थिक कोंडी करून अडचणीत आणत आहे ह्या सर्व समस्यांसाठी जनावरांची खरेदी नकरण्याचा एकमताने निर्णय घेत शासनाच्या परिपत्रकानुसार ठरवण्यात आलेल्या जनावरांची कतली नकरण्याचा आणि खरेदी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा एकमताने निर्णय घेतला असून जोपर्यंतराज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येणार नाही तोपर्यंत खाटीक (कुरेशी) समाजासह शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक फटका सहन करावा लागेल अशीच परिस्थिती दिसत आहे आणि सरकारनेयांच्या मागण्यांकडे लक्ष देत लवकरात लवकर योग्य ते तोडगा काढावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांन कडून केली जात आहे.



