Uncategorized

हिमायतनगरच्या उर्दू जिल्हा परिषद् शाळेतील विद्यार्थाचें शिक्षण विभागच करते शैक्षणिक नुकसान

हिमायतनगर प्रतिनिधि :- अजिम हिंदुस्तानी

दि २४ जुलै २५

हिमायतनगर येथील उर्दू जिल्हा परिषद् हायस्कूल शाळेत तब्बल चार वर्षापासून गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थाचें शैक्षणिक नुकसान होत आहे तात्काळ दोन विषयाच्या शिक्षकांची भर्ती करावी अशी मागणी गेल्या चार वर्षा पासून उर्दू शाळा व शल्य व्यवस्थापन समिती यांच्या कडून केली जात आहे. जिल्हा शिक्षण विभाग या विषयाकडे जनीव पूर्वक दुर्लक्ष करील असल्याचे शंका ही हिमायतनगर वासियांकडून व्यक्त केली जात आहे 

 माघील वर्षापासून१ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण चांगल्या पध्तीचे  दिले, जात होते  या शाळेतुन अनेक विद्यार्थी गुणवंत,यश प्राप्त केलेले व मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहे,

सद्याच्या शाळेत सन २०२१ पासून  वी ते १० वी पर्यन्त उर्दूच्या विद्यार्थांना गणित आणि विज्ञान या विषयास शिकवीण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत,

होयउर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीतअशीसमस्या आहेअनेक ठिकाणी उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीतज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेही समस्या अधिक गंभीर आहे.

हिमायतनगर येथील जिल्हा परिषद् हायस्कूलला शिक्षक नसल्याची मागणी नांदेड जिल्हा शिक्षण विभागाला अनेक वेळा जिल्हा परिषद् हायस्कूल  व शाल्य व्यवस्थापन समिती कडून सन २०२१ मधे मागणी करण्यात आली होती त्यात कोरोना लॉकडाउन झाल्याने ती मागणी जसेच्या तशीच राहिली परंतु लोकडाउन संपल्यानंतर त्या मागणी ची नांदेड जिल्हा शिक्षण विभागाने  दखल घेतली नाही,अशीमाहिती मिळाली आहे,वास्तविक पाहता जिल्हा परिषद् शाळेला गणित आणि विज्ञान शिक्षक नसल्याने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान विद्यार्थीचा  होत आहे,

हिमायतनगर उर्दू शाळेत शिक्षण विभागाने तात्काळ गणित व विज्ञान विभागाच्या शिक्षक भर्ती करावी जेणेकरुन उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानासारखे महत्वाचे विषय शिकण्यास मदतहोईल आणि त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button