Uncategorized

मुखेड प्रहार जनशक्ती पक्षाचं रस्ता रोको आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक

मुखेड प्रतिनिधी:- २५ जुलै २५

शेतकरी कर्जमाफीशेतमजूरदिव्यांगमेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मांगण्यासाठी मुखेड येथे दि २४ जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मुखेड महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलंजवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती.

आंदोलनाच्या शेवटी  प्रहार जनशक्ती पक्षांच्या वतीने तहसीलदार राजेश जाधव व पोलिस निरीक्षक केंद्रे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात सहभागी झालेले साईनाथ बोईनवाड प्रहार शहराध्यक्ष मुखेड ,शिवशंकर पाटील कलंबरकर स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष.,शंकर भाऊ वडेवार प्रहार दक्षिण युवा जिल्हा अध्यक्ष.नितीन पा हेळगिरेप्रहार युवा ताअध्यक्ष.,गिरीधर पाटील केरुरकर मुखेड छावा तालुका अध्यक्षव्याख्याते बजरंग पाटील पाळेकर.,संतोष पाटील बेळीकरयुवा.ता.सचिव.प्रहार.,बालाजी आईनवाड पाळेकर.ता.उपाध्यक्ष ,बालाजी राठोड प्रहार विधानसभाअध्यक्ष,बळीराम भाऊ गेडेवाड शहर युवा उपाध्यक्ष,प्रदीप पाटील हसनाळकर,बळवंत पा धनंजकर,जब्बार शेख पाळेकरअंकुश बोनतेवाड पाळेकर आदी  शेतकरी,विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते 

मुखेड पोलिसाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलानाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button